Skip to main content
www.mdkamble.in

शिवा Valentine 💌 — प्रेमाचा खरा अर्थ

...

💠 *शिवा Valentine 💌 — प्रेमाचा खरा अर्थ* 
* या वर्षी १४/१५ फेब्रुवारीला महाशिवरात्र आणि Valentine Day एकत्र आले. म्हणून सहज विचार आला खरं प्रेम कोणतं?
* शिव म्हणजे केवळ देव नाही, तो जगनिर्मितीचा आधार आणि मानव जीवनाबद्दल सजग असलेली चैतन्य ऊर्जा आहे.
* शिव–शक्ती, म्हणजेच पार्वती — जनककन्या, जगजननी, सौंदर्य व करुणेचं रूप. तिचं प्रेम फक्त भावना नव्हतं; ते तपस्या, उपवास, कष्ट, संयम आणि प्रतीक्षा यांनी सिद्ध झालेलं होतं.
* योग्य व्यक्ती मिळण्यासाठी आणि योग्य प्रेम टिकण्यासाठी कष्ट आवश्यक असतात — हेच पार्वतीच्या जीवनातून शिकायला मिळतं. तिचं प्रेम निरपेक्ष होतं. ती शिवावर प्रेम करत असताना, शिवाने इच्छेने विष्णु, राम रूप धारण केलं. 
* रामरूपात त्यांनी वनवास, दुःख, रावणवास सहन केला — हेच खरं प्रेम.
* शिवाचं प्रेम निर्मळ होतं, पण ते कडक शिस्तीचं देखील होतं.
* अन्नपूर्णा रूप धारण करून पार्वतीने जगाला अन्नदानाचं महत्त्व शिकवलं — प्रेम म्हणजे जबाबदारी.
* शिवाचं प्रेम अति-उत्साही किंवा बेफिकीर नव्हतं, ते योग्य क्षणी, योग्य प्रकारे व्यक्त होणारं होतं. पार्वती स्नानासाठी गेल्यावर गणेशाने शिवाला अडवलं, तेव्हा शिरच्छेदापर्यंत प्रसंग गेला — कारण नियम, कर्तव्य आणि मर्यादा.
तरीही
* शिव–पार्वतीचं प्रेम उत्कंठा, प्रतीक्षा आणि अपार संयमाने भरलेलं होतं.
असंच प्रेम
* विष्णु–लक्ष्मी मध्येही दिसतं — दूरून वेगळं वाटतं, पण आतून खूप जवळचं, स्थिर आणि संतुलित. 
म्हणूनच
♦️प्रेमाला Valentine लागत नाही.
* प्रेमात हवं असतं — सत्य, संयम, माया, कष्ट, सहनशीलता, मान्यता, वचनबद्धता, निर्मळता आणि सहज सुंदरता.
* जर आपण ईश्वराला मानत असू, तर प्रेमही हवं ते मिळवण्यासाठी नाही, तर स्वतःला देण्यासाठी असायला हवं.

💠 Shiva Valentine 💌 — The True Meaning of Love

* This year, Mahashivratri and Valentine’s Day fall together on the 14th/15th of February. So a natural question arose — what is true love?

* Shiva is not merely a deity; he is the foundation of creation and a conscious energy aware of human life.
* Shiva–Shakti, that is Parvati — daughter of the mountains, mother of the universe, the embodiment of beauty and compassion. Her love was not just an emotion; it was proven through penance, fasting, hardship, discipline, and patience.

* To find the right person and to sustain the right love, effort is necessary — this is what we learn from Parvati’s life. Her love was selfless. While she loved Shiva, he willingly assumed the forms of Vishnu and Rama.

* In the form of Rama, he endured exile, suffering, and even captivity under Ravana — this is true love.

* Shiva’s love was pure, yet it was also disciplined.
* By taking the form of Annapurna, Parvati taught the world the importance of offering food — love means responsibility.

* Shiva’s love was neither overly emotional nor careless; it was expressed at the right time and in the right way. When Parvati went for a bath and Ganesha stopped Shiva, the situation even led to beheading — because of rules, duty, and boundaries.

Yet,
* the love of Shiva and Parvati was filled with longing, waiting, and immense patience.

A similar love is seen in Vishnu and Lakshmi — seemingly separate from a distance, yet deeply close, stable, and balanced within.

Therefore,
♦️ Love does not need Valentine’s Day.

* Love requires — truth, patience, affection, effort, tolerance, acceptance, commitment, purity, and natural grace.

* If we believe in God, then love should not be about getting what we desire, but about offering ourselves.